बातम्या

सिद्धार्थ च्या पालकांनी वर्गखोली बांधकामास ५००० रु . ची देणगी

Siddharths parents spent Rs 5000 for the construction of a classroom donation of


By nisha patil - 5/4/2024 6:18:33 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी  मनपा राजे छत्रपती संभाजी वि . मं . क्र . 66 , मोरे कॉलनी , कोल्हापूर शाळेतील इ .  १ ली चा विद्यार्थी कु . सिद्धार्थ स्वप्निल साठे याच्या वाढदिवसा निमित्त पालक स्वाती स्वप्निल साठे व कुटुंबिय यांनी शाळा वर्गखोली बांधकामास ५००० रु . ची देणगी दिली .   यावेळी शाळेत सिध्दार्थ  चा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला . 

सिद्धार्थ ने आपल्या वाढदिवसा निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप केले . 

विशेष कौतुकास्पद बाब 

सिद्धार्थ चे विशेष कौतुक म्हणजे त्याने वर्षभर खाऊसाठी दिलेले पैसे एका बचत बँकेत साठवले व आज वाढदिवसा दिवशी साठवलेले सर्व पैसे शाळेस भेट दिले . त्याने शाळेस ७७६ इ . रु . भेट दिले . 

त्याच्या या कृतीचे सर्व शिक्षक व पालक यांनी अभिनंदन केले . व त्याने सर्व विद्यार्था साठी एक आदर्श निर्माण केला . त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक करण्यात आले . पालकांच्या व शिक्षकांनी केलेल्या संस्कारामुळे अशी संस्कारक्षम मुले घडत आहेत . त्याबद्दल पालक सौ . स्वाती व श्री . स्वप्निल साठे व साठे परिवार यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


सिद्धार्थ च्या पालकांनी वर्गखोली बांधकामास ५००० रु . ची देणगी