बातम्या

आषाढी एकादशीचे महत्त्व

Significance of Ashadhi Ekadashi


By nisha patil - 6/29/2023 7:22:46 AM
Share This News:



आषाढ महिन्यातील (जून-जुलै) शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी / महा एकादशी / देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. या दिवसापासून चतुङ्र्कास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी) या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बाधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. 83 मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. 516 मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. 1296 मध्ये चालू झाली; तर इ.स. 1650 मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणार्‍या पालखीची प्रथा पाडली.द्रभागेच्या वाळवंटा (नदीकाठच्या छोटय़ाशा वाळूच्या मैदाना) पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद ङ्खरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायर्‍या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला ‘नामदेव पायरी’ म्हणतात. कोपर्‍यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे.


आषाढी एकादशीचे महत्त्व