बातम्या
बालिंगा फुलाशेजारील भरावा विरोधात लक्षणीय उपोषण
By nisha patil - 6/2/2024 10:32:10 PM
Share This News:
बालिंगा फुलाशेजारील भरावा विरोधात लक्षणीय उपोषण
कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील रस्त्याचे काम सध्या सुरू असून बालिंगा पुलाच्या बाजूने भरावा टाकून वाढवलेल्या रस्त्याच्या उंचीमुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे बालिंगा ते दोनवडे या दरम्यान शास्त्रीय अभ्यास करून भोगावती नदीवरील बालिंगा पुलांची लांबी वाढवावी तसेच दोनवडे कडील बाजूस मोठ्या मोहऱ्या बांधाव्यात या मागणीसाठी पूरग्रस्त समितीच्या वतीने 13 फेब्रुवारी रोजी लाक्षणीय उपोषण करण्याचा इशारा पूरग्रस्त समितीच्या वतीने देण्यात आला आहे ग्रामपंचायत कोपर्डे येथे पार पडलेल्या बैठकीस बाजीराव खाडे यांच्यासह 35 गावातील सरपंच आणि उपसरपंच उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत लोकांसमोर रस्ते विकास कामाचे सादरीकरण करावे या जनभावनाचे गांभीर्य समजून घेऊन पुराच्या धोक्यापासून कोल्हापूरच्या जनतेस दिलासा देण्यासाठी व मागण्यांच्या पूर्ततेसाठी सध्या चालू असणाऱ्या कोल्हापूर गगनबावडा महामार्गाचे विकास काम याबाबतची माहिती संबंधित खात्याचे अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन घ्यावी आणि दुरुस्त्यानुसार योग्य ते बदल करून रस्ते विकासाचे काम सुरू करावे आणि संबंधितास आदेश द्यावेत अशी विनंती यावेळी करण्यात आली यापूर्वी पूरग्रस्त समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एकशे तीस पुरग्रस्त गावाच्या ग्रामसभेच्या ठराव दिलेला आहे तसेच इतर बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी पूरग्रस्त समितीने महात्मा गांधी पुतळे पापाची तिकटी कोल्हापूर येथे एक दिवसीय उपोषण केले होते जर वरील मागण्या मान्य केल्या नाही तर पूर्वग्रस्तांना आपले उद्ध्वस्त होणारे संसार वाचण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी उत्तम वरुटे ,मेघा पाटील जोशना पाटील शिवाजी कांबळे सरदार तडुलकर अजित पाटील भगवान देसाई सरदार पाटील यांच्यासह सरपंच उपसरपंच उपस्थित होते
बालिंगा फुलाशेजारील भरावा विरोधात लक्षणीय उपोषण
|