बातम्या

मनसेचे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे?

Signs of intensification of MNS agitation


By nisha patil - 1/16/2024 11:18:10 PM
Share This News:



कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्यातील  शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदाना मिळाले नाही. यामुळे  मनसेच्या वतीने विभागिय सहनिबंधक आँफीसमोर पाच दिवसापासून 
आमरण उपोषण सुरु असून आंदोलकांच्या तब्येत खालावली असल्याने आंदोलन तिव्र होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 या आंदोलनाला पाठिंबा देऊन लेखाजोखा करण्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे,शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांनी संबधितांना जाब विचारण्यात आला.यात काही समाधानकारक उत्तर आले नसल्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रसाद पाटील यांनी तारा न्युज शी बोलताना सांगितले.
 लवकर मार्ग मोकळा केला जाईल म्हणून संबधितांनी सांगितले असता,असला निर्णय नको ठोस उपाययोजना करा तरच मनसेचे उपोषण मागे घेऊ अन्यथा आंदोलन तीव्र करुन करण्यात येईल. असेही यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 50000अनुदान जाहीर केले होत पण चुकीचे निकष लावून प्रामाणिक शेतकऱ्यांना  अपात्र ठरवल आहे.  
   नियमित व मुदतीत पिक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती या योजनेचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांना कर्जाची नियमित फेड करण्यास संस्थान मिळावे म्हणून शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना पन्नास हजार किंवा त्यापेक्षा कमी जितकी उचल असेल तितकीच रक्कम देण्याची घोषित केले होते.
 
शेतकऱ्यांना सर्व अटी व निकष दूर करून प्रोत्साहन पर अनुदान  आठ दिवसांत देण्यात यावे अन्यथा मनसेच्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशारा देण्यात आलाय
   

आमरण उपोषण ला मनसेचे शहर अध्यक्ष राजु दिंडोर्ले, प्रसाद पाटील, अमित पाटील, निलेश धुम्मा, अमित पाटील, अमर बचाटे,अभिजित पाटील, नवनाथ निकम,अमर कंदले,शरद जाधव,विक्रम नरके आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


मनसेचे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे?