बातम्या

सिकंदर शेख ला जनसुराज्यशक्ती श्री 'किताब...

Sikandar Shaikh Jansuraj Shakti Shri Kitab


By nisha patil - 12/14/2023 3:34:01 PM
Share This News:



 लाखों कुस्तीशौकिनांची उत्कंठा लागून राहिलेल्या प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्यशक्ती श्री किताबाच्या लढतीमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने दिल्लीच्या मोनू दहिया याला निकाली हावावर अवघ्या सातव्या मिनिटात चितपट करून किताब पटकावला. सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी वारणा समूहाच्या वतीने विद्यालयाच्या पटांगणावर भारत विरुद्ध इराम आंतरराष्ट्रीय विश्वनाथ वारणा शक्ती श्री' कुस्ती महासंग्राम पार पडला आहे. 

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी वारणा समूहाच्या वतीने विद्यालयाच्या पटांगणावर भारत विरुद्ध इराम आंतरराष्ट्रीय विश्वनाथ वारणा शक्ती श्री' कुस्ती महासंग्राम पार पडला.प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्यशक्ती श्री किताबाच्या लढतीमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने दिल्लीच्या मोनू दहिया याला निकाली हावावर अवघ्या सातव्या मिनिटात चितपट करून किताब पटकावला.  प्रमुख ११ शक्ती श्री किताबासह ३५ पुरस्कृत, तर दोनशेवर कुस्त्या रंगल्या होत्या, दुपारी २ वाजता वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर जाधव यांच्या हस्ते झाला रात्री दहा वाजता सिकंदर शेख विरुद्ध मोनू दहिया (दिल्ली) यांच्यात लढत सुरू झाली. यात हाताचा घुटना मानेवर ठेवून एकमेकांवर ताबा घेण्याचा प्रयत्न झाला.सिकंदरने ६व्या मिनिटाला एकचाक डावावर दहियावर पकड घेतली व यात तो यशस्वी झाला ७ व्या मिनिटाला कुस्ती निकाली झाली आमदार डॉक्टर विनय कोरे युवानेते  विश्वेश कोरे प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांच्या हस्ते सिकंदराच्या जनसुराज्यशक्ती श्री 'किताब मिळाला.


सिकंदर शेख ला जनसुराज्यशक्ती श्री 'किताब...