बातम्या

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये विवेकानंदच्या ज्ञानेश्वरी पाटीलला सिल्वर मेडल

Silver Medal to Vivekanandas Dnyaneshwari Patil in National Shooting Competition


By nisha patil - 8/1/2025 6:36:40 PM
Share This News:



राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये विवेकानंदच्या

ज्ञानेश्वरी पाटीलला सिल्वर मेडल

 कोल्हापूर दि 08 :  मध्यप्रदेश भोपाळ येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे  मध्ये विवेकानंद महाविद्यालयाची  एम. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स भाग 2 मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी कुमारी ज्ञानेश्वरी जयवीर पाटील हिला ५० मी. थ्री पोजिशन एअर रायफल मध्ये सिल्वर पदक मिळाले.  या यशाबद्दल कु.ज्ञानेश्वरीचा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या खेळाडूला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे  संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. श्री. कौस्तुभ गावडे,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे प्रोत्साहन लाभले. याप्रसंगी त्यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर खेळाडूस जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर. बी.जोग व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.  या यशाबद्दल तिचे  सर्वत्र अभिनंदन होत आहे.


राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये विवेकानंदच्या ज्ञानेश्वरी पाटीलला सिल्वर मेडल
Total Views: 84