बातम्या
एन एच आय चे रिजनल हेड अंशुमलू श्रीवास्तव व अधिकारी यांचेकडून कागल येथे रस्ता विस्तारीकरण कामाची साईट पाहणी
By nisha patil - 8/9/2023 7:12:57 PM
Share This News:
कागल प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे रिजनल हेड अंशुमलू श्रीवास्तव यांनी कागल येथे रस्ते विस्तारीकरण अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाची व कागल शहरात प्रवेश करणारा रस्ता मोठा करण्याच्या कामाची प्रत्यक्ष साईट पाहणी केली. यावेळी त्यांचेसोबत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे उपस्थित होते.
सध्या,कागल -सातारा हायवे चे सहा पदरीकरणाचे विस्तरिकानाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.त्या अनुषंगाने कागल शहरात प्रवेश करणारा शंभर वर्षापूर्वीचा अरुंद असलेला रस्ता नव्याने करताना मोठा करावा, व या ठिकाणी उभारन्यात येणारे उड्डाणपूल कराडच्या धर्तीवर पिलर उभारून करा अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी मागील महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
श्री घाटगे यांच्या निवेदनाची दखल घेत तात्काळ या ठिकाणचा सर्व्हे करून त्याप्रमाणे सविस्तर अहवाल सादर करा असे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाला दिले होते.
त्यानुसार चार दिवसांपुर्वी श्री घाटगे यांनी संबधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती.
श्री घाटगे यांनी केलेली मागणी व सूचना कागल शहर व परिसराच्या वाढत्या लोकसंख्येच्या व रहदारीच्या दृष्टीने योग्य व बरोबर असल्याने संबंधित अधिकारी या मागणीबाबत सकारात्मक आहेत. याबाबतचा सविस्तर सर्व्हे रिपोर्ट लवकरच ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असलेने या कामाला गती येणार आहे.
यावेळी त्यांच्या सोबत एन एच आय चे प्रकल्प संचालक श्री वसंत पंदरकर, उप प्रबंधक श्री गोविंद भैरवा,
रोडवेज कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प अधिकारी वैभव पाटील महादेव चौगले, साईट इंजिनियर श्री भरडे ,महेश पाटोळे, कन्सल्टिंग विभागाचे विलास देशमाने, यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी शाहूचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने,राजू पाटील,विवेक कुलकर्णी, जयवंत रावण, आशिफ मुल्ला,विठ्ठल निंबाळकर,राजू जाधव,बाळासाहेब जाधव,यांच्यासह व्यापारी व्यवसायिक व नागरिक उपस्थित होते.
एन एच आय चे रिजनल हेड अंशुमलू श्रीवास्तव व अधिकारी यांचेकडून कागल येथे रस्ता विस्तारीकरण कामाची साईट पाहणी
|