बातम्या

एकाच जागी बसून राहणे बेतू शकते तुमच्या जीवावर...?

Sitting in one place can kill you


By neeta - 12/27/2023 3:07:27 PM
Share This News:



एकाच जागी बसून राहणे बेतू शकते तुमच्या जीवावर...?

 

दुपारची झोप म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण असतो.  दुपारच्या झोपे शिवाय ते राहू शकत नाहीत. 25 दिवसभर एकाच ठिकाणी रट्टे मारून बसणे पसंत करतात त्यांच्यासाठी मात्र ही एक चिंतेची बाब ठरू शकते. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन आणि युनिव्हर्सिटी ऑफ साडी ने एकत्रित केलेला अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, छोट्या मोठ्या हालचाली करत राहिलं तर उद्याच आरोग्य ठणठणीत राहतं अगदी चालणं, मॉर्निंग वॉकला जाणं ,किंवा एका जागी उभं राहणं हे सुद्धा फायदाच असतं. कोणतेही हालचाल केली तर उद्याच्या पेशी अधिक लवचिक होतात आणि हृदय अधिक मजबूत होतं मात्र यावर एका जागी बसून राहणाऱ्यांना हृदयासंदर्भातील समस्या निर्माण होऊ त्या भविष्यात अधिक गंभीर होऊ शकतात. दीर्घकाळ एका जागी बसून काम करण्याच्या सर्वाधिक वाईट परिणाम हृदयावर होतो. रोज सहा मिनिटे उत्तम व्यायाम केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास सुरुवात होते असा दावा यात करण्यात आला आहे.
   संगणकाने केलेल्या दाव्यानुसार जे लोक एकाच ठिकाणी अनेक तास बसून असतात ते बसल्याबसल्या वेगवेगळे पदार्थ खात असतात. अशा गोष्टींपेक्षा त्यांनी झोप काढल्यास आरोग्याला अधिक फायदा होऊ शकतो. उद्या संदर्भातील समस्या पासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे व्यायाम करण्याचा. व्यायाम केल्याने हृदय अधिक सुरक्षित राहते एका जागी बसून काम केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते .याचाही या संशोधनात उल्लेख करण्यात आला आहे.
   या संशोधनासाठी 15,253 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या, या लोकांच्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या  24 तासांसाठी या 15,253 जणांच्या शरीरामध्ये एक गॅझेट लावून त्यांच्या शारीरिक हालचाली मोजण्यात आल्या. जे लोक व्यायाम करतात किंवा हालचाली करतात त्यांना हृदयासंदर्भातील समस्या निर्माण होण्याची शक्यता फारच कमी असते. व्यायाम करणाऱ्या किंवा सातत्याने हालचाली करणाऱ्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे कमी होतं दिवसभरातील अगदी चार ते बारा मिनिटे व्यायाम केला तरी हे अधिक लाभदायी ठरते


एकाच जागी बसून राहणे बेतू शकते तुमच्या जीवावर...?