बातम्या
सौंदर्य वाढविण्यासाठी उशी न घेता झोपावे
By nisha patil - 12/22/2023 7:37:56 AM
Share This News:
डोक्याखाली उशी घेऊन झोपणे अगदी सामान्य आहे. अनेक लोकांना उशीविना झोप येत नाही. परंतू विशेषज्ञांप्रमाणे उशीविना झोपणे अधिक फायदेशीर आहे याने शरीर नैसर्गिक स्थितीमध्ये असतं आणि लहान मुलांसारखी झोप येते. उशी ने घेता झोपण्याने आरोग्य तर उत्तम राहताच सौंदर्य वाढविण्यासाठी हे योग्य आहे.पिंपल्सपासून मुक्ती
उशीविना झोपल्याने चेहर्यावर पिंपल्स येण्याची शक्यता नाहीशी होते. कारण उशी वापरल्याने त्यावर जमा असलेल्या धुळीमुळे पिंपल्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुरकुत्या येत नाही
उशी वापरल्याने चेहर्यावर दबाव पडत असतो ज्याने वयापूर्वी सुरकुत्या येतात.
तारुण्य वाढतं
उशी घेऊन झोपल्याने अधिक काळ झोप घेतल्यावरदेखील थकवा जाणवतो परंतू उशी न वापरल्याने तणावरहित झोप लागते ज्यामुळे त्वचा फ्रेश राहते आणि आपण नेहमी तरुण दिसतात.
ग्लो वाढतो
ज्यांना झोप न येण्याची तक्रार असते त्यांनी उशी घेतल्याविना झोपावे ज्याने शांत झोप लागते आणि रिलॅक्स जाणवतं. शरीर रिलॅक्स असल्यास चेहर्यावरील ग्लो आपोआप वाढतो.
सौंदर्य वाढविण्यासाठी उशी न घेता झोपावे
|