बातम्या

सडपातळ महिलांनी वजन वाढवण्यासाठी ‘या’ 4 गोष्टींचं सेवन करावं

Slim women should consume these 4 things to gain weight


By nisha patil - 11/23/2023 7:15:02 AM
Share This News:



 सध्या काही लोक असे आहेत जे लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, तर काहीजण दुर्बलतेमुळे त्रस्त आहेत. अतिशय किरकोळ देहयष्टी असल्यास वजन वाढवणे सुद्धा खुप अवघड असते. विशेष करून महिलांसाठी हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. महिला आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कठिण प्रयत्न करतात, परंतु त्यांना यामध्ये यश मिळत नाही. जर तुमचे शरीर सुद्धा खुप किरकोळ असेल आणि वजन वाढवायचे असेल तर, कोणत्या वस्तूंचे सेवन करावे, ते जाणून घेवूयात…

या वस्तूंचा उपयोग करा

1 दूध आणि मधरोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात मध मिसळून सेवन करा. यातून तुम्हाला लवकर परिणाम दिसून येईल.

2 सलाड

वजन वाढवायचे असेल तर लंचसोबत सलाड घ्या. चिकन आणि अंडी खात नसाल तरी, लंचमध्ये चिकन विंग्स जरूर घ्या. यासोबतच भात आणि डाळ खा. सोयाबीनची भाजीसुद्धा खाऊ शकता.

3 केळे

वजन वाढवण्यात केळ्याची मुख्य भूमिका असते. एका केळ्यात 100 कॅलरीज असतात. एका रिसर्चनुसार जर व्यक्तीने डाएटमध्ये 500 कॅलरीज घेतल्या, तर आठवड्यात त्याचे वजन अर्धा किलो वाढते. केळ्याचा शेकसुद्धा बनवू शकता.

4 बदाम

रात्री काही बदाम भिजत ठेवा. सकाळी त्याची साल काढून सेवन करा. हे बदाम वाटून दुधासोबत मध टाकून सुद्धा घेऊ शकता. सोबतच रोज एक्सरसाइज जरूर करा.


सडपातळ महिलांनी वजन वाढवण्यासाठी ‘या’ 4 गोष्टींचं सेवन करावं