बातम्या

कोल्हापूर दक्षिणमध्ये वेग मंदावला

Slow down in Kolhapur South


By nisha patil - 7/5/2024 8:39:30 PM
Share This News:



कोल्हापूर दक्षिणमध्ये  मतदानाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45.62 टक्के मतदानाची नोंद झाली होती, तर कोल्हापूर उत्तर मध्ये 49.54 टक्के मतदानाची नोंद झाली. तुलनेमध्ये चंदगड कागल आणि राधानगरी व मतदार संघामध्ये मतदानाचा वेग दुपार असूनही वाढल्याचे दिसून येत आहे. चंदगडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 51.45 टक्के मतदानाची नोंद झाली. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये 54.70 टक्के मतदानाची नोंद झाली, तर राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 51.81 टक्के मतदानाची नोंद झाली.
 

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज चुरशीने मतदान सुरू आहे. दुपार तीनपर्यंत कोल्हापूरमध्ये 51.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे तर हातकणंगलेमध्ये 49.94 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी करवीरने आतापर्यंत घेतलेली आघाडी कायम आहे. करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानामध्ये घेतलेली आघाडी कायम आहे. 
दरम्यान, कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा वेग मंदावल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अजून मतदान होण्याचे गरजेचं असून राहिलेल्या तासांमध्ये ताबडतोब मतदानाला कसे येतील ते पाहावे, असे आवाहन केलं आहे.


कोल्हापूर दक्षिणमध्ये वेग मंदावला