बातम्या

महिलांना सक्षम करणार स्मिता फाउंडेशन

Smita Foundation will empower women


By nisha patil - 10/17/2023 7:15:41 PM
Share This News:



महिलांना  सक्षम करणार स्मिता फाउंडेशन 
 

स्मिता फाउंडेशन यांच्या वतीने घटस्थापने निमित्त महिलांना घरबसल्या काम देण्याचा शुभारंभ 

शिवसेना महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) व स्मिता फाउंडेशन यांच्या वतीने घटस्थापने निमित्त महिलांना घरबसल्या काम देण्याचा शुभारंभ चा कार्यक्रम स्मिता सावंत मांडरे यांच्या नेतृत्वाखाली  महालक्ष्मी हॉल प्रतिभा नगर येथे करण्यात आला

शिवसेनेचे प्रमुख  धोरण आहे 80% समाज करण त्या धोरणांतर्गत महिला  सक्षमीकरण ,  महिलांना रोजगार मिळवून देणे ,त्यांचे हाताला काम मिळवून देणे त्यांना आर्थिक बळकटी देऊन स्वयंमपूर्ण  बनवणे यासाठी शिवसेना ही कायम तत्पर असते. उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांढरे यांच्या नेतृत्वाखालीघटस्थापनेचे  निमित्त साधून   शिवसेना महिला आघाडी व स्मिता फाउंडेशनच्या माध्यमातून घर बसल्या महिलांना काम देण्याची योजना चालू केली होती त्याचा शुभारंभ सोमवारी  शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी 42 महिलांना काम देण्यात आले 

यासाठी आदरणीय रश्मीताई ठाकरे वहिनी, कोल्हापूरचे संपर्कप्रमुख आरुभाई दुधवडकर , उप नेत्या मीनाताई कांबळी, महिला संपर्क संघटिका श्रद्धा ताई जाधव, जयश्री बळीकर, जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार साहेब ,जिल्हा संघटिका शुभांगी ताई पोवार यांचे मार्गदर्शन लाभले

यापुढे देखील महिलांना कायम सक्षम करायचा प्रयत्न शिवसेना महिला आघाडी व स्मिता फाउंडेशन करणार आहे 
यावेळी उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांडरे , सुरेखा भोसले, सविता कानुरकर, स्वरूपा खुरंदळे, शोभा नीलमनवर, माधवी लोणारे, अनिता ठोंबरे ,विजया भंडारी, जयश्री मडीवरकर , प्रेरणा वाकळे ,आरती गोंदकर ,संगीता मुळीक व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या


महिलांना सक्षम करणार स्मिता फाउंडेशन