बातम्या

तर मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतो - पै.चंद्रहार पाटील

So I withdraw from the arena of Lok Sabha elections  Mr Chandrahar Patil


By nisha patil - 4/15/2024 11:13:05 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर :  प्रतिनिधी मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला निवडणूक लढतवता येणार नाही?  हे  काँग्रेस पक्षाने जाहीर करावे मी माघार घेतो? मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझे आजोबा मुख्यमंत्री नव्हते, माझे वडील आमदार नाहीत तर मला निवडून रडता येणार नाही? असे काँग्रेसने जाहीर करावे मी निवडणुकीतून माघार घेतो असं मोठं विधान सांगली लोकसभेचे अधिकृत उमेदवार चंद्रहार। पाटील आज  सांगितले. पैलवान चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस गुंता वाढत गेला. तसेच पैलवान पाटील यांच्या उमेदवारी ला काँग्रेस नेतेमंडळींनी विरोध केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी मुद्दामपणे टार्गेट करत होते. यावर आज चंद्रहार पाटलांनी सदरचे विधान केले ह्या त्यांच्या भावनिक विधानामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकच चर्चा रंगली ती चंद्रहार पाटील यांच्या विधानाची...


तर मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतो - पै.चंद्रहार पाटील