बातम्या

जिल्ह्यात आतापर्यंत अभय योजनेमध्ये ५५०१ ग्राहकांनी सहभाग नोंदविला

So far 5501 customers have participated in Abhay Yojana in the district


By nisha patil - 8/1/2025 6:30:29 PM
Share This News:



 जिल्ह्यात आतापर्यंत अभय योजनेमध्ये ५५०१ ग्राहकांनी सहभाग नोंदविला

 कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना थकबाकी एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेद्वारे दिलीय. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार ५०१ ग्राहकांनी सहभाग नोंदविलाय. योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आलीय. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता जी. पी. लटपटे यांनी केलेय.  

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना थकबाकी एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेद्वारे दिली आहे. संपूर्ण व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होणाऱ्या या योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार ५०१ ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे.थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरू केली. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविली आहे. मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळते. मूळ थकबाकीची ३० टक्के रक्कम भरून उर्वरित रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची सोय आहे. त्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता जी. पी. लटपटे यांनी केलय.


जिल्ह्यात आतापर्यंत अभय योजनेमध्ये ५५०१ ग्राहकांनी सहभाग नोंदविला
Total Views: 63