बातम्या
तर त्यांना राज्यसभेवर का घेतलं नाही........
By nisha patil - 4/22/2024 3:16:26 PM
Share This News:
एमआयएमसारख्या जहालवादी पक्षाचा पाठिंबा कोल्हापुरात शाहू महाराजांना महागात पडणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भगव्या ध्वजाचे मानकरी असणाऱ्या शाहू महाराजांना आता बाजूला वेगळा झेंडा लावायचा आहे का? समतेचा संदेश देणारे शाहू महाराज जहालवादी लोकांसोबत जाणार का? अशी विचारणा केली. काँग्रेसने कधीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांना मानलं नसल्याचे म्हणाले. शाहू महाराजांना सन्मानच द्यायचा होता तर त्यांना राज्यसभेवर का घेतलं नाही? अशी विचारणा त्यांनी केली.
आरोप मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचाही आक्षेप
राजेश क्षीरसागर यांनी एमआयएमच्या पाठिंब्यावर आक्षेप घेतल्यानंतर मराठा आंदोलक दिलीप पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, कोल्हापुरात एमआयएमची हिरवी लाट आणण्याचा प्रयत्न असून कोल्हापूरचा बेहरमपाडा आणि भिवंडी करायचे आहे म्हणूनच एमआयएमने शाहू महाराज याना पाठिंबा दिला आहे.
त्यांनी सांगितले की, सीएएबाबत आंदोलनाचे नेतृत्व केल्याने कोल्हापुरात एमआयएमला पोषक वातावरण वाटत आहे. त्यामुळेच हे सगळं सुरू असल्याचा आरोप दिलीप पाटील यांनी केला. एमआयएम रझाकार आणि निजामाचे वंशज आहेत, तर औरंगजेबच्या थडग्यावर फुले उधळणारे वंचित सुद्धा पाठिंबा देत असेल तर हे मोठे षड्यंत्र आहे. आम्हाला निजाम आणि औरंगजेबाचा महाराष्ट्र आम्हाला करायचा नाही. कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचा बदला घेण्याचाही प्रयत्न यातून दिसून येत असून कोल्हापूरकरांनी सावध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शाहू महाराजांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी, नव्याने स्थापन बहुजन पक्षानंतर एमआयएम पक्षानेही शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत शाहू महाजारांना पाठिंबा दिला. कोल्हापुरात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलि आणि शाहू महाराजांमध्ये थेट लढत होत आहे. अन्य अपक्षांनी अर्ज दाखल केले असले, तरी तुल्यबळ लढत शाहू महाराज आणि मंडलिक यांच्यामध्येच होणार आहे.
तर त्यांना राज्यसभेवर का घेतलं नाही........
|