बातम्या
सोशल मीडिया वस्तुनिष्ठतेने वापरल्यास ठरेल प्रभावी – चंद्रकांत पाटील
By nisha patil - 7/1/2025 7:52:21 PM
Share This News:
सोशल मीडिया वस्तुनिष्ठतेने वापरल्यास ठरेल प्रभावी – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर, प्रतिनिधी: गत दशकभरात सोशल मीडियाने संप्रेषण क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोन आणि वाढलेल्या इंटरनेट सुविधेमुळे मिनिटा-मिनिटाची माहिती मिळणे सुलभ झाले आहे. मात्र, या माध्यमाचा जबाबदारीने वापर होणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी संघाचे उपाध्यक्ष कृष्णात चौगले, सचिव सुरेश पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
"सोशल मीडियाचा वापर करताना वस्तुनिष्ठता आणि सामाजिक भान जपणे अत्यावश्यक आहे," असे सांगत पाटील पुढे म्हणाले, "सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरल्यास समाजविघातक गोष्टी घडू शकतात. त्यामुळे माहिती पोस्ट करण्याआधी तिच्या सत्यतेची खातरजमा करणे गरजेचे आहे."
कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सोशल मीडियाच्या सद्यस्थितीवर आपली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उत्तम पाटील यांनी केले, तर आभार बाजीराव फराकटे यांनी मानले यावेळी
कृष्णात चौगले, सुरेश पाटील, आकाश कांबळे, रूपाली चव्हाण, नाज अत्तार, दीपक मेटील, अमृता पवार यांच्यासह अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सोशल मीडिया वस्तुनिष्ठतेने वापरल्यास ठरेल प्रभावी – चंद्रकांत पाटील
|