बातम्या

शिवसेनेची उद्या रविवार दि.१७ रोजी सोशल मिडिया कार्यकर्ता कार्यशाळा

Social media worker workshop of Shiv Sena tomorrow Sunday 17th


By nisha patil - 3/16/2024 12:50:15 PM
Share This News:



कोल्हापूर दि.१६ : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने राज्यभर सोशल मिडिया कार्यकर्ता कार्यशाळा शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी रविवार दि.१७ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत "उद्योगपती माधवराव बुधले सभागृह, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर"  येथे पार पडणार आहे. या शिबिरासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रचारासाठी सोशल मिडीया हे माध्यम प्रभावी ठरणार आहे. आधुनिक काळात प्रचार यंत्रणांची बदलेली प्रणालीचा योग्य वापर करून मतदारांपर्यंत पक्षाचे काम पोहचविण्याचे आव्हान शिवसैनिकांनी पेलावे. यासाठी सोशल मिडीयाचा वापर कशा पद्धतीने करावा यासह इतर निवडणूक कार्यपद्धतीवर या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या शिबिरास कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, रिक्षा चालक सेना, फेरीवाले सेना, कामगार सेना, अनुसूचित जाती जमाती सेना सह सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर यांचेमार्फत करण्यात आले आहे. 
 


शिवसेनेची उद्या रविवार दि.१७ रोजी सोशल मिडिया कार्यकर्ता कार्यशाळा