बातम्या

शिरढोण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांचे निधन

Social worker Sanjay Patil from Shirdhon passed away


By nisha patil - 9/30/2023 8:47:50 PM
Share This News:



शिरढोण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांचे निधन 

शिरढोण प्रतिनिधी : ता.३० शिरढोण ( ता.शिरोळ)येथील सामाजिक कार्यकर्ते,  कला -क्रीडा- सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व  संजय रामगोंडा पाटील (धाकलं पाटील) यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी आकस्मित  दुःखद निधन झाले. श्रीकृष्ण भक्त मंडळ व श्रावण पायी दिंडी सोहळा समितीचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेच्या रमजानशेठ बाणदार विद्यालय शिरढोणचे स्कूल कमिटी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते  अविनाश रामगोंडा पाटील यांचे ते कनिष्ठ बंधू होत. संजय पाटील यांच्या निधनाने शिरढोण इचलकरंजी कारदगा परिसरात दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ ,दोन बहिणी,  तीन मुली , जावई असा परिवार आहे


शिरढोण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांचे निधन