बातम्या
दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांसाठी समाजाने पुढाकार घ्यावा – न्यायमूर्ती इंगळे
By nisha patil - 12/2/2025 6:20:30 PM
Share This News:
दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांसाठी समाजाने पुढाकार घ्यावा – न्यायमूर्ती इंगळे
कोल्हापूर: दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर त्यांचे प्रत्यक्ष अधिकार मिळवून देण्यासाठी सामान्य नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. एस. इंगळे यांनी केले.
सक्षम संस्थेच्या वतीने आयोजित ‘बाल हक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणी’ या व्याख्यानात ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींना संपत्ती मिळवण्याचा, शिक्षणाचा, व्यवसायाचा आणि सरकारी सेवांचा संपूर्ण अधिकार आहे, परंतु त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण विनामूल्य कायदेशीर सल्ला आणि मदत देते, याबाबत माहिती फार कमी लोकांना असते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे समाजाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला सक्षम संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शुभांगी खारकांडे, ॲड. अमोघ भागवत, जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल निपसे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांसाठी समाजाने पुढाकार घ्यावा – न्यायमूर्ती इंगळे
|