बातम्या

कोल्हापूरमध्ये सौर ऊर्जा जनजागृती मेळावा

Solar energy awareness gathering for electricity consumers


By nisha patil - 1/27/2025 9:44:01 PM
Share This News:



कोल्हापूरमध्ये सौर ऊर्जा जनजागृती मेळावा

कोल्हापूर, २७ जानेवारी २०२५: महावितरण व सोलर बीएनआय सामाजिक संस्थेच्या वतीने सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृतीचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. हा मेळावा २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० दरम्यान हॉटेल अयोध्या, ताराराणी चौक (कावळा नाका) कोल्हापूर येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्दीष्ट सौर ऊर्जेचे फायदे आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आहे. यामध्ये प्रधानमंत्री सूर्य घर योजना, सौर कृषी पंप, आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांची माहिती दिली जाईल. सौर ऊर्जा प्रणाली बसवणाऱ्या तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे.

सर्व घरमालक, व्यावसायिक आणि सौर ऊर्जा स्वीकारण्यास इच्छुक व्यक्तींना या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अधिक माहितीसाठी 7770024466 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.


कोल्हापूरमध्ये सौर ऊर्जा जनजागृती मेळावा
Total Views: 62