विशेष बातम्या

अंतराळात सौर ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी

Solar energy generation experiment in space successful


By nisha patil - 3/7/2023 1:31:08 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम : अपारंपारिक ऊर्जा निर्मितीमध्ये नेहमीच अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात. सौर ऊर्जा ही एक अपारंपारिक ऊर्जा मानली जाते.  सर्वसाधारणपणे या ऊर्जेचे उत्पादन पृथ्वीवरच होत असले तरी आता शास्त्रज्ञांनी अंतराळातही सौरऊर्जेचे उत्पादन करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.
अंतराळात अशा प्रकारे निर्माण झालेली सौर ऊर्जा पृथ्वीवर वापरासाठी दाखलही झाली आहे. अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग ही एक लेखकाची कल्पना असली तरी ती आता प्रत्यक्षात आली आहे. 1940 मध्ये विज्ञान कथा लेखक आयझॅक असीमोव यांनी आपल्या रीजन नावाचं लघुकथेमध्ये अंतराळातील सौर उर्जा निर्मितीची कल्पना रेखाटली होती पण आता नासाच्या शास्त्रज्ञांनी ती प्रत्यक्षात आणली असून मेपल नावाच्या एका अवकाश यानाच्या साहाय्याने सौर ऊर्जा तयार करण्यात आली आहे.

जी वापरासाठी पृथ्वीवर पाठवण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहे. नासाने जानेवारी 2023 मध्ये मेपल नावाचे अवकाश यान अंतरात पाठवले होते ज्याच्यावर सौर पॅनल लावण्यात आली होती. अंतराळतील सौर पॅनल पृथ्वीवरील सौर पॅनल पेक्षा आठ पट जास्त ऊर्जा निर्माण करू शकतात असाही शास्त्रज्ञांचा दावा आहे. जागतिक पातळीचा विचार करता चार टक्के ऊर्जा निर्मिती ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून केली जाते पण पृथ्वीवर सूर्यप्रकाश नेहमीच उपलब्ध नसल्याने अनेक वेळा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये अडचणी येतात पण शास्त्रज्ञांनी मेपल या अवकाशयानाच्या माध्यमातून जी सौर पॅनल अंतराळात पाठवली आहेत.
ती पॅनेल अंतराळात उपलब्ध असलेल्या प्रकाशाचा वापर करून ऊर्जा निर्मिती करण्याचे काम करत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शास्त्रज्ञांनी आणखीन काही सौर पॅनल अंतरात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी ढग कमी आहेत आणि सूर्यप्रकाश मुबलक आहे अशा भागांमध्ये सौर पॅनल पाठवून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती करण्याची शास्त्रज्ञांची योजना आहे.

मेपल अवकाशानाच्या साह्याने सौर ऊर्जा तयार करण्यात आली आहे. ती संपूर्णपणे वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवण्यात आली आहे त्यामुळे शास्त्रज्ञांचा उत्साह जास्तच वाढला आहे. आगामी कालावधीमध्ये पृथ्वीला जे ऊर्जेचे संकट जाणवणार आहे त्यावर मात करण्यासाठी अंतराळातील सौर ऊर्जा निर्मिती महत्त्वाची मदत ठरू शकेल असे शास्त्रज्ञांना वाटते.


अंतराळात सौर ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी