बातम्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

Solve the problems of Anganwadi employees


By nisha patil - 12/26/2023 2:45:59 PM
Share This News:



अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

कागल : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आणि प्रश्नांची मला जाणीव आहे. बुधवारी हा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडू अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागल मध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आयोजित मोर्चा समोर पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.  कामगार नेते अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. संघटनेच्या वतीने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

  यावेळी कामगार नेते अतुल दिघे म्हणाले, मानधन नको वेतन हवे, ही आमची मुख्य मागणी आहे. सरकारने तीन जानेवारीपर्यंत या मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा 50000 हून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस मुंबईत दाखल होतील. निवेदनामध्ये विविध मागण्यांचा समावेश आहे पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, सुरुवातीच्या काळात बहुतांशी अंगणवाडी सेविकांच्या नेमणुका मिच केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणि प्रश्नाची मला जाणीव आहे हा धागा पकडत कामगार नेते अतुल देगे म्हणाले पालकमंत्री असे तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतीचा मोठे भाऊ आहेत त्यांनी तमाम बहिणीची पाठराख करावी.


अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही