बातम्या

कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक प्रयत्न करत आहेत : सतेज पाटील

Some elements are trying to disturb the peace of Kolhapur Satej Patil


By nisha patil - 6/17/2024 8:24:40 PM
Share This News:



लोकसभा निवडणुकीआधी  कोल्हापूरमध्ये  दंगली घडवल्या गेल्या, त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? असा गंभीर आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोपही त्यांनी केला काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू सभेच्या संमेलनात संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी कोल्हापूर सहपरिसरामध्ये जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याचा दावा केला होता. परांडे या वक्तव्याचा कोल्हापुरात पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींनी विरोध केला होता. जबरदस्तीने धर्मांतर होत असेल, तर संबंधितांवर कारवाई करा. अन्यथा, कोल्हापूर बदनामी करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या मिलिंद परांडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.


कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक प्रयत्न करत आहेत : सतेज पाटील
Total Views: 2