बातम्या

60+ ज्येष्ठ नागरिका साठी काही आवश्यक माहिती.

Some essential information for 60


By nisha patil - 3/26/2024 9:42:43 AM
Share This News:




 1. घशात अन्न अडकणे

 2. मान दुखणे

 3. पायात गोळे येणे

 4. पायला मुंग्या येणे.

 विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी खाली दिलेले सोपे उपाय डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी  मदतीचे ठरू शकतात.
 १. घशात अन्न‌ अडकणे

 आपल्याला फक्त "हात वर करणे" आवश्यक आहे.
 हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास , आपल्या घश्यात अडकलेले अन्न आपसुक खाली जाण्यास मदत होईल.

 २. मान दुखी

 कधीकधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो. याला चुकीची उशी वापरणे हे एक कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून आपले पाय एका घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरूद्ध‌ दिशेने हलवले तर आराम मिळू शकेल

 ३. पायात गोळे येणे

 जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळे अथवा‌ पेटके आले असतील तर आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरे वाटेल.

 ४. पायाला मुंग्या येणे

  जेव्हा डावा पायास मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला उजवा हात गोलाकार फिरवा, जेव्हा उजवा पाय मुंग्या येत असेल, तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गोलाकार फिरवा. याने‌ लगेच फायदा होईल.
 चालणे म्हणजे दुसरे हदय.

आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले "दुसरे हृदय" म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.
सर्वाँना हृदयाचे कार्य काय असते ते ठाउक असेलच.
हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहातं नाही.
पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो.
होय. खर आहे.
आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे.
हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात.
रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.

पायाच्या पोटरी मधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.
त्यांना " मसल विनस सायनस असे" म्हणतात.

 

ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्या मध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदया कडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावा मुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे  रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.
घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो.
आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपा यातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी  पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते.
रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. 

 

आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत   बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते. 

एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते. याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फफुसात जाऊन फसू शकतात ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.
  


60+ ज्येष्ठ नागरिका साठी काही आवश्यक माहिती.