बातम्या
वयाच्या 40 शी नंतर फिट्ट तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच 100 वर्ष निरोगी जगण्यासाठी काही नियम
By nisha patil - 12/20/2024 12:25:19 AM
Share This News:
1. रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी म्हणजे सकाळी उठल्यानंतर ताजेतवानं वाटेल.
2. रोज मॉर्निंग वॉक करावं.
3. रोज मेडिटेशन, योगा करायला हवा. यामुळे एकाग्रता वाढते आणि तणावही दूर होईल.
4. रोज व्यायाम केला पाहिजे, यामुळे शरीर निरोगी राहते.
5. सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या म्हणजे पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही व शरीरशुद्धीकरणही होईल. दिवसातून 8-10 ग्लास पाणी अवश्य प्या.
6. अन्नातूनच शरीराला पौष्टीक घटक मिळवण्याचा प्रयत्न करा.
7. चिंता, भय आणि क्रोध हे माणसाचे शत्रू असून त्यांच्यापासून दूर राहावं.
8. स्वतःला कायम कामामध्ये व्यस्त ठेवले पाहिजे, ज्यामुळे आरोग्य चांगलं राहते.
9. कोमट किंवा थंड पाण्यात लिंबू आणि मध मिसळून रोज प्या.
10. रोज झोपण्यापूर्वी आर्धा-पाऊण तास आधी व संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनी दुधाचे सेवन केल्याने गाढ झोप लागेल.
11. अन्न चांगल्या प्रकारे चावून-चावून खावे.
12. चांगल्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे.
13. मादक पदार्थांचे सेवन करू नये.
14. अन्न नेहमी चांगले आणि पौष्टिक असावे. तळलेले पदार्थ टाळावेत. दूध-दही, फळे आणि भाज्या नियमित खावे आणि अन्न वेळेवर खावे.
15. फास्ट फूड, जंक फूडपासून दूर राहावं.
16. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
17. रोज एक सफरचंद किंवा कोणतेही एक फळ खायला हवं.
18. मनमोकळेपणाने हसा आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.
19. नेहमी सकारात्मक विचार करा.
20. आठवड्यातून दोनदा शरीराला तेलाने मसाज करा म्हणजे शरीर निरोगी राहील.
वयाच्या 40 शी नंतर फिट्ट तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच 100 वर्ष निरोगी जगण्यासाठी काही नियम
|