बातम्या

दक्षिण आफ्रिकेत धावणार कोल्हापूरपुत्र

Son of Kolhapur will run in South Africa


By nisha patil - 5/28/2024 7:56:28 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे पन्हाळा :प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेत येत्या नऊ जूनला होणाऱ्या जगातील सर्वात जुन्या, मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या कॉग्रेड मॅरेथॉनसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उंड्री,ता.पन्हाळा.येथील अमोल एकनाथ यादव धावणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील डरबन ते पीटर मेरीसबर्ग या दोन शहरातून ही मॅरेथॉन असेल. दक्षिण आफ्रिकेतील सैनिकांच्या स्मरणार्थ असलेल्या या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ९० किलोमीटर अंतर तब्बल १२ तासांच्या आत पार करायचे असते. या स्पर्धेत जगभरातून ३५ हजार धावक तर भारतातून २५० धावक सहभागी होणार आहेत. अत्यंत कठीण आणि एकूण १८०० मीटर उंच चढण धावकांना पार करायची असते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धावकांना ४२.२ किलोमीटरचे अंतर चार तासात पार करावे लागते आणि नंतरच संघात निवड होते. अमोल यादव यांनी ४२.२ किलोमीटर अंतर ३ तास १६ मिनिटात  पार करून आपली भारतीय संघात निवड पक्की केली आहे. 
             

कोल्हापूर जिल्ह्यातून भारताचे प्रतिनिधीत्व करणारे हे पहिलेच रनर आहेत., मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागणाऱ्या सरावासाठी सातारामधील शिव-स्पिरिट चे कोच मा.शिव यादव सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरु केला. शिव -स्पिरिट च्या  माध्यमातून देशासाठी मेडल आणण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.चार  जूनला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या स्पर्धेची तयारी पाच महिने आधीपासूनच सुरू केली, शिव सरांच्या ट्रेनिंग प्लॅननुसार पहाटे चार वाजता उठून धावावे लागते. त्यांनी जवळपास एका महिन्यात २५० ते ३०० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. तर एका आठवड्यात अंदाजे ८० ते १०० किलोमीटर रनिंग करण्यात आले. यामध्येच एक लाँग रन असून हा रन ३० किंवा ५० किलोमीटरचा असतो. आठवड्यात एक दिवस विश्रांती घेऊन पुन्हा मॅरेथॉनच्या तयारीसाठी वेगवेगळी ट्रेनिंग अॅक्टिव्हिटी करण्यात येते. आठवड्यातला एक दिवस धिम्या गतीने तर कधी तेज गतीत रन ठेवण्यात येतो. मॅरेथॉनमध्ये पळताना स्नायूंना क्रॅम्प येऊ नये, यासाठी स्लो किंवा फास्ट रनची तयारी आधी करावी लागते,पाच महिन्यांपासून स्पर्धेची तयारी सुरु आहे. 
आतापर्यंत शिव  मार्गदर्शनाखाली अमोल यादव यांनी,
टाटा मुंबई मॅराथॉन ४२किमी ३:१६:३४ ,
टाटा अल्ट्रा मॅराथॉन ५०किमी ४:२७:००,
कास अल्ट्रा मॅराथॉन ६५किमी ६:१७:००(४ था नंबर) हा आजवरच्या कॉम्रेड मॅराथॉन प्रॅक्टिस रन चा प्रवास आहे.
कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये पळणारे बहुतांश धावक हे आपला जॉब सांभाळून या मॅरेथॉनमध्ये भाग घेत असतात.


दक्षिण आफ्रिकेत धावणार कोल्हापूरपुत्र