बातम्या

सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात

Sonakshi Sinha will get stuck in marriage


By nisha patil - 10/6/2024 3:35:41 PM
Share This News:



हीरामंडी' या वेबसीरिजमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री आपला बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत  येत्या 23 जूनला लग्नबंधनात अडकू शकते. सोनाक्षी आणि जहीर खाजगी पद्धीतीत लग्नबंधनात अडकणार आहेत. निवडक पाहुण्यांना या लग्नसोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. सोनाक्षीच्या लग्नसोहळ्याला 'हीरामंडी'  सीरिजच्या संपूर्ण टीमची विशेष उपस्थिती असणार आहे. अद्याप लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
 

जहीर इकबाल हा सलमा खानचा बालपणीचा मित्र इकबाल रतनसी याचा मुलगा आहे. त्यामुळे सलमानने आपल्या प्रोडक्शन बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या 'नोटबुक' या चित्रपटाच्या माध्यमातून लॉन्च केलं होतं. या चित्रपटाच्या माध्यमातून मोहनीश बहल यांची लेक प्रनूतन हिनेदेखील पदार्पण केलं होतं. पण दोघेही जादू दाखवण्यात कमी पडले.


सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात