बातम्या
बांधारी परिसरात समाज कार्य करणाऱ्या सोनल दळवींची सहकारात उडी
By nisha patil - 1/29/2024 5:18:29 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे पन्हाळा : प्रतिनिधी बांधारी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील गरीब, गरजूंना वेळोवेळी मदत करणार्या सोनल दळवी यांनी सहकारात उडी घेतली आहे. त्यांनी काढलेली सिध्देश्वर पतसंस्था लवकरच नावलौकीक मिळवेल असे आमदार विनय कोरे यांनी कोतोली येथील उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते
कणेरी येथील सिध्देश्वर पतसंस्था २६ जानेवारी ला कोतोली येथे सुरु करण्यात आली.या संस्थेच्या माध्यमातून गरजूंना व्यवसाय करण्यासाठी कर्जपुरवठा करण्यात येईल. तसेच संस्थेच्या माध्यमातून समासदांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येणार असल्याचे संस्थापक चेअरमन सोनल अनिलकुमार दळवी यांनी सांगितले.
यावेळी विविध मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोकुळ संचालक अजित नरके,अमर पाटील, हनुमान उद्योग समुहाचे नेते बळवंत पाटील, जि प.सदस्य शंकर पाटील, सरपंच शिला कुंभार, व्हा चेअरमन विष्णू पाटील,मा.सरपंच गणपती पाटील,मा.सरपंच विकास पाटील, नरहरीचे चेअरमन विजय खोत सुनील चौगुले,मा.उपसरपंच संभाजी पोवार,मा.सरपंच मनोहर पाटील,सुरेश पोवार,यशवंत, सावेकर,पत्रकार ज्ञानदेव. पाटील,हिंदूराव लगारे,विलास पाटील, सुनील तुरंबेकर आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व कणेरीतील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांधारी परिसरात समाज कार्य करणाऱ्या सोनल दळवींची सहकारात उडी
|