बातम्या

खत म्हणून सोनबोरूचा वापर का केला जातोय?

Sonboru used as fertilizer


By nisha patil - 1/27/2024 7:29:22 PM
Share This News:



शेतीतरासायनिक खतांचा मोठा भडीमार असल्याने जमिनीचा पोत ढाळत चालला आहे. अशावेळी जमिनीचे आरोग्य टिकविण्याकरिता शेणखता सोबतच सेंद्रीय खताची नितांत गरज आहे. त्यामुळे काही उपयुक्त सेंद्रिय खतांचा उपयोग करत जमिनीचे आरोग्य टिकवणे क्रमप्राप्त झाले आहे.

गेल्या काही शेतातच सोनबोरू सारख्या वनस्पतीजन्य खतांची शेती करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सद्यस्थितीत अनियमित रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चाललेला आहे. अमर्याद रासायनिक खताच्या वापरामुळे रोगराई वाढत उत्पन्न खर्च वाढलेला आहे. कृषी विभागामार्फत वारंवार शेतकऱ्यांना वर्षभर मार्गदर्शन करीत सेंद्रीय शेती, सेंद्रीय खते वापरण्याकडे लक्ष देण्याचे आव्हान केले जाते. यातील काही होतकरू व सुधारित शेतकरी दोन्ही हंगामाला हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करतात. सद्यस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात सोनबोरू लावून जमिनीचे आरोग्य सुधारणेकडे विशेष लक्ष दिले आहे.

सोनबोरूची शेती वाढत असून खत म्हणून इतर पिकांना उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. अगदी पंचवीस ते तीस दिवसात सेंद्रीय खता करिता उपयुक्त ठरून वातावरणातील उपयुक्त घटक जमिनीत उपलब्ध करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मोठी मदत करतात. हिरवळीच्या खताने जमीन कोवळी होऊन सुपीक बनते. सुपीक जमीन पिकाला सकारात्मक ऊर्जा देते. रोगराइर्पासून बचाव करते. पर्यायाने कीटकनाशकांचा खर्च वाचून शेती कमी खर्चाची कसायला मोठी मदत होते.


खत म्हणून सोनबोरूचा वापर का केला जातोय?