बातम्या

लवकरच बेबी पेंग्विनला अटक होणार - नितेश राणे

Soon baby penguin will be arrested Nitesh Rane


By nisha patil - 3/11/2023 8:24:31 PM
Share This News:



 भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस  छत्तीसगडच्या दौऱ्यावर असल्याने उद्धव ठाकरेंनी  टीका केली होती. त्यावर जरांगे पाटील  यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही? हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? असा सवाल राणेंनी सोशल मीडियावर ट्विट करत ठाकेरंवर निशाणा सढळ आहे 

मराठा आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस पक्षाच्या प्रचारासाठी  छत्तीसगढ दौऱ्यावर असताना ठाकरेंनी टीका केली होती  त्यावरून नितेश राणे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत   ठाकेरंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले  ठाकरे कुटुंब  काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झाले आहे. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही, असा सवाल नितेश राणेंनी उद्धव  ठाकरेंना केला. देवेंद्र फडणवीस पक्षाच्या कामासाठी गेले होते, कौटुंबिक सहलीसाठी गेले नव्हते असे म्हणत नितेश राणेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.  
    शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना काही दिवसांत अटक होणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे बिथरले आहेत, असा मोठा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. आज पुन्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेचे नाव न घेता डिवचले आहे.  सुशांत सिंह राजपूत प्रकरणात लवकरच बेबी पेंग्विनला लवकरच अटक होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले.
     तसेच जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालिया   हिने देखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी सातत्याने या दोन्ही आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. आता पुन्हा त्यांनी या प्रकरणावरून आदित्य ठाकरे वर निशाणा साधला आहे.


लवकरच बेबी पेंग्विनला अटक होणार - नितेश राणे