मनोरंजन
जिया खान मृत्यूप्रकरणात सूरज पांचोली निर्दोष
By nisha patil -
Share This News:
तब्बल 10 वर्षे चालला खटला अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरण खटला तब्बल दहा वर्षे या खटल्यामध्ये सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांअभवी सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टानं जियाची आई राबिया खान यांना या निकालाल आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे. 10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोलीला जिया खान मृत्यूप्रकरणात निर्दोष घोषित केलं आहे. सूरज पांचोलीवर बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. पुराव्यांअभवी हे न्यायालय सूरज पांचोलीला दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद म्हणाले.3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली.जिया खानच्या घरातून सहा पानांची सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये जियानं सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप केले होते. मृत्यू प्रकरणातून सूरजची निर्दोष मुक्तता झाली आहे.
जिया खान मृत्यूप्रकरणात सूरज पांचोली निर्दोष
|