बातम्या

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या 'भोला शंकर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Southern Superstar Chiranjeevi


By nisha patil - 7/28/2023 7:41:25 PM
Share This News:



दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी  सध्या त्याच्या आगामी 'भोला शंकर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'भोला शंकर'चा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.'भोला शंकर' या सिनेमात कीर्ती सुरेश आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये चिरंजीवीचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. धमाकेदार ट्रेलरनंतर प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. हा पॅन इंडिया सिनेमा असल्याने निर्माते वेगवेगळ्या भाषांमध्ये सिनेमा रिलीज करणार आहेत. भोला शंकर' या मनोरंजनात्मक सिनेमात चिरंजीवीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल असे म्हटले जात आहे. 15 ऑगस्टच्या सुट्टीचा सिनेमाच्या कमाईवर चांगला परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास 'भोला शंकर' सज्ज आहे.


दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या 'भोला शंकर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज