कोल्हापूरच्या पश्चिम भागात पेरण्यांना गती

Sowing speed up in western part of Kolhapur


By nisha patil - 1/7/2023 4:43:43 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त इतर पडणारी पावसाची रिपरिप शेतीसाठी दिलासादायक ठरत आहे. विशेष करून पश्चिम भागात सातत्याने अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकऱ्यांची पेरण्यांसाठी लगबग सुरू आहे.सहा दिवसांपासून धरणांच्या पाणी पातळीत कमी अधिक प्रमाणात वाढ दिसून येत आहे. राधानगरी, दूधगंगा, कुंभी आणि पाटगाव प्रकल्पांत पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे.गुरुवारी (ता. २९) सकाळी ८.३० पर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात आजरा तालुक्यात चिकोत्रा प्रकल्प परिसरात सर्वाधिक ८६ मिमी पावसाची नोंद झाली, तर सर्वांत कमी पावसाची नोंद चंदगडमधील जंगमहट्टी प्रकल्प परिसरात (८ मिमी) झाली.
राधानगरी पाणलोट क्षेत्रातही पावसाची अधूनमधून जोरदार सर येते. तर इतर वेळेला रिमझिम पाऊस कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात रखडलेल्या पेरण्यांची कामे प्रगती पथावर आहेत. वळीव किंवा मॉन्सूनपूर्व पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या मजूरांकडून पूर्ण करून घेण्याची वेळ आली आहे.

 


कोल्हापूरच्या पश्चिम भागात पेरण्यांना गती