बातम्या
अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन
By nisha patil - 7/8/2024 10:22:24 PM
Share This News:
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष मोहिमेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात ही मोहीम राबविण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे नियोजन असून सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्यावर कारवाई होऊ नये याकरीता आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या तरतुदींचे पालन करुनच व्यवसाय करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे पदावधित अधिकारी तथा सहायक आयुक्त तु.ना. शिंगाडे यांनी केले आहे.
या मोहिमेमध्ये प्रशासनाकडून जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व नावाजलेल्या विविध हॉटेल्स, फास्ट फूड विक्रेते, मोठ-मोठे उत्पादक, घाऊक वितरक, इत्यादींच्या सखोल तपासण्या करण्यात येणार असून तपासणीमध्ये आढळलेल्या अनियमिततांच्या अनुषंगे व्यावसायिकांवर शीघ्रतेने कारवाई करण्याचे निर्देश मंत्री महोदयांकडून देण्यात आलेले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन
|