स्पीड न्यूज लाईट 24 आता नव्या रूपात आणि नव्या दमात :स्पीड न्यूज लाईव्ह 24 चे तारा न्यूज मध्ये झाले नामांतरण

Speed ​​News Lite 24 now in a new look and with a new breath Speed ​​News Live 24 renamed as Tara News


By nisha patil - 5/29/2023 4:15:50 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी अल्पावधीतच कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेल्या स्पीड न्यूज लाईट 24 चैनल च्या दर्शकांपर्यंत नेहमीच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रातील बातम्या त्याचबरोबर माहिती आणि मनोरंजनांचा खजिना पोहोचवण्याचं काम सुरू आहे. तसेच विविध सामाजिक प्रश्न आणि अन्यायग्रस्त गरजूंच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम देखील स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या माध्यमातून करण्यात आलंय. 28 मे रोजी स्पीड न्यूज लाईट ट्वेंटी फोर चा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने स्पीड न्यूज लाईट 24 चे नामांतरण करण्यात आलं. सर्वांच्या हक्काचं स्पीड न्यूज लाईट 24 चॅनेल आता तारा न्यूज या नव्या नावाने आपल्या आपल्या दर्शकांच्या सेवेत रुजू होतंय.. वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्पीड न्यूज लाईट 24 च्या व्यवस्थापकीय संचालिका ॲड. कल्पिता कुंभार यांच्या शुभहस्ते रोपट्याला पाणी घालून आणि फित कापून  तारा न्यूजच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. गेल्या चार वर्षात स्पीड न्यूज लाईट 24 च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्याबरोबरच रस्त्यावर उतरून अन्यायाविरोधात लढणाऱ्यांचा आवाज बनलेले हक्काचे चॅनेल आता तारा न्यूज या नावाने ओळखले जाणार आहे. त्यामुळे यापुढे तारा न्यूज आपल्या दर्शकापर्यंत तात्काळ बातम्या माहिती आणि मनोरंजनांचा खजिना पोहोचवणार आहे. 
या लोगो अनावरण प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तारा न्यूज चे संचालक श्रीनिवास नाझरे ,प्रोग्रामिंग हेड सुरेखा शेजाळे, प्रोडूसर सद्दाम अली, प्रतिनिधी पूजा नायकवाडे , व्हिडिओ जर्नलिस्ट ओंकार वळवडे, वृत्त निवेदिका आणि एडिटर रुचिता भालकर ,एडिटर मंदार रेळेकर, निलेश लोहार केतन खाडे, वेब आणि सोशल मीडिया हॅण्डलर निशा पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते ...


स्पीड न्यूज लाईट 24 आता नव्या रूपात आणि नव्या दमात :स्पीड न्यूज लाईव्ह 24 चे तारा न्यूज मध्ये झाले नामांतरण