बातम्या
स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीला गती द्या - जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 3/28/2024 8:03:46 PM
Share This News:
स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीला गती द्या - जिल्हाधिकारी अमोल येडगे
अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न..
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल व सहाय्यक नोडल अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. लोकसभा निवडणुका जिल्ह्यात नियोजनबद्ध व सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी निवडणुकीची कामे वेळेत पूर्ण करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
तसेच लोकसभा निवडणूकीची कामे गतिमान झाली असून आता प्रत्येक मतदारसंघात मनुष्यबळ पोहचत आहे. सर्व मतदारांपर्यंत आपापली निवडणूक यंत्रणा पोहचून आवश्यक माहिती व मतदारांची जनजागृती करेल याची खात्री प्रत्येक निवडणूकीसाठी नेमलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यानी करावी याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
या बैठकीवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, निवडणूक निर्णय अधिकारी हातकणंगले संजय शिंदे, सारथीच्या अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण श्रीम.किरण कुलकर्णी, उप जिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.
स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीला गती द्या - जिल्हाधिकारी अमोल येडगे
|