बातम्या
राज्यात सरकार स्थापनेसाठी घडामोडींना वेग; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मोठे निर्णय अपेक्षित
By nisha patil - 5/12/2024 9:28:29 PM
Share This News:
राज्यात सरकार स्थापनेसाठी घडामोडींना वेग; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मोठे निर्णय अपेक्षित
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दहा दिवस उलटले तरी राज्यात सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीतील मुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रीपदांच्या वाटपावर चर्चा सुरू आहे. महायुतीने यंदाच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवत विजयाचे श्रेय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आणि राज्यातील महिलांना दिले आहे.
महायुतीने निवडणुकीपूर्वी या योजनेअंतर्गत दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, जे आता पूर्ण करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. तसेच या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे.
राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असला तरी, सरकार पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचतेय का, याची खात्री करण्यासाठी तपासणी प्रक्रिया राबवणार आहे. या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थ्यांची छाननी होऊन योजनेची पारदर्शकता वाढणार आहे. वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार, या तपासणीमुळे खोटे दावे करणाऱ्यांना योजनेतून वगळण्यात येईल, तर खरोखर गरजू महिलांपर्यंत आर्थिक मदत पोहोचेल.
सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीवर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यात सरकार स्थापनेसाठी घडामोडींना वेग; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मोठे निर्णय अपेक्षित
|