बातम्या
विकेंडला जेवणाची चव वाढवा खमंग पारंपारिक पाटवडीने, कमी साहित्यात - कमी वेळात डिश तयार
By nisha patil - 9/17/2023 7:45:07 AM
Share This News:
साहित्य :
चणाडाळीचे पीठ, ताक दोन वाटी, चवीनुसार मीठ, हळद, हिरवी मिरची, लसूण, तेल, खोबऱ्याचा खिस, कोथिंबीर.
कृती :
मिरची लसूण वाटून घ्या. तेलाची फोडणी करुन त्यात वाटलेला गोळा घाला. परतून झाले की एक वाटी पाणी घाला.
बेसनपीठ ताकात चांगले एकजीव करुन घ्या. फोडणी केलेले पाणी गरम झाले की, त्यात बसेन पीठाचे मिश्रण घालून मंद आचेवर दाट होईतोवर शिजवनू घ्या. नंतर खाली उतरवून ताटात पसरवून त्यावर कोथिंबीर तीळ, खोबरे खिस, पसरवा. हाताने थोडे दाबून वड्या कापा.
विकेंडला जेवणाची चव वाढवा खमंग पारंपारिक पाटवडीने, कमी साहित्यात - कमी वेळात डिश तयार
|