बातम्या

अध्यात्मिक अनुभव

Spiritual experience


By nisha patil - 4/11/2023 7:10:40 AM
Share This News:



तुमच्या अस्तित्वाच्या गहनतेचा शोध घ्या ध्यानामध्ये तळ गाठण्याकरिता एका योग्यता असलेल्या शिक्षकाकडून मंत्र प्राप्त करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. सहज समाधी ध्यान, ध्यानाची गहनता अनुभवण्यासाठी एका योग्यता असलेल्या शिक्षकाकडून मंत्र प्राप्त करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये एका साध्या सोप्या ध्वनीचा मनातल्या मनात उच्चार करून मन शांत व अंतर्मुख करण्याचे तंत्र शिकविले जाते. जेव्हा गहन शांततेमध्ये मन आणि चेतासंस्था यांना काही क्षणांची विश्रांती मिळते, तेव्हा आपल्या प्रगतीला अडसर ठरणारे अडथळे हळूहळू विरघळून जाऊ लागतात. या तंत्राच्या नियमित सरावाने शांतता, अधिक उर्जा आणि जागरूकता दिवसभर कायम राखता येते आणि त्यामुळे आपल्या आयुष्याचे संपूर्णपणे रुपांतर घडून येऊ शकते.

आशीर्वाद देण्याची आणि बरे करण्याची शक्ती प्राप्त करून घ्या
ब्लेसिंग (आशीर्वाद) कार्यक्रमामध्ये समृद्धी, तृप्ती आणि कृतार्थता हे आपल्या मधील सुप्त गुण विकसीत होतात. कृतार्थता हा चैतन्याचा फारच सुंदर गुण आहे. यामुळे आपल्याला आशीर्वाद देण्याची क्षमता आणि बरे करण्याचे माध्यम बनणे शक्य होते. आशीर्वाद मागणाऱ्याला तो देता येणे ही तुमच्यातील प्रेमळ वृत्ती व सेवाभावाचे द्योतक आहे. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने समोरच्या व्यक्तीचे आयुष्य पालटू शकते. अनेक लोकांना चमत्कारिक अनुभव आलेले ऐकिवात आहेत.

कृतज्ञतेत बहरून या
अध्यात्मिक मार्गावर असलेल्या बहरून आलेल्या चैतन्याची सर्वांत पवित्र आणि शुद्ध अभिव्यक्ती म्हणजे कृतज्ञता. पवित्र गुरु परंपरेतील गुरु, ज्यांनी हे अनमोल ज्ञान वर्षानवर्षे सांभाळून ठेवले आहे त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच गुरु पूजा होय.
जेव्हा एक थेंब सागराला जाऊन मिळतो तेव्हा त्याला सागराएवढी बळकटी वाटते. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण गुरुपरंपरेतील गुरुंसोबत जोडले जातो तेव्हा अनंत शक्तीचा स्रोत्र आपल्याला प्राप्त होतो.


अध्यात्मिक अनुभव