बातम्या
प्रायव्हेट इंग्लिश स्कूलच्या रक्तदान शिबीरास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 11/26/2024 11:03:23 PM
Share This News:
प्रायव्हेट इंग्लिश स्कूलच्या रक्तदान शिबीरास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या अॅड. पी.आर. मुंडरगी प्राय. इंग्लिश स्कूल यांच्या वतीने कोल्हापूर येथे दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी वैभवीलक्ष्मी ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबीरात पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि 'रक्तदान हेच जीवनदान' हे सूत्र प्रत्यक्षात उतरवत भरघोस प्रमाणात रक्तदान केले. समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेने प्रेरित होऊन सहभागी झालेल्या रक्तदात्यांनी, आपल्या एका रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात, हे सिद्ध केले.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी अरुण डोंगरे, मिलिंद करमळकर आणि कोषाध्यक्ष गिरीश जांभळीकर यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले. शाळेचे मुख्याध्यापक ए.पी. नागुरकर व मुख्याध्यापिका ए.एस. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.
प्रायव्हेट इंग्लिश स्कूलच्या रक्तदान शिबीरास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
|