मनोरंजन
छावा चित्रपटाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
By nisha patil - 2/14/2025 3:55:18 PM
Share This News:
छावा चित्रपटाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
प्रभात चित्रपटगृह येथे मर्दानी खेळाचे आयोजन...
आज प्रदर्शित झालेल्या, बहुचर्चित छावा चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रभात चित्रपटगृहासमोर प्रेक्षकांचे ढोल- ताशाच्या गजरात आणि मर्दानी खेळाने स्वागत करण्यात आलंय.
आज प्रदर्शित झालेल्या, बहुचर्चित छावा चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रभात चित्रपटगृहासमोर प्रेक्षकांचे ढोल- ताशाच्या गजरात आणि मर्दानी खेळाने स्वागत करण्यात आलंय. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित, विकी कौशलची प्रमुख भूमिका असणारा छावा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला. त्याचबरोबर प्रभात, रॉयल, शाहू, पद्मा या एकपडदा चित्रपटगृहांबरोबर मल्टिप्लेक्स येथेही प्रदर्शित झाला. सर्वच ठिकाणी चित्रपटाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथे उभारलेल्या संभाजी महाराजांच्या पोस्टरला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी नारायण रुईकर, वरुण रुईकर यांच्यासह मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
छावा चित्रपटाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
|