बातम्या

गांधी शिल्प बाजार प्रदर्शनाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to Gandhi Sculpture Bazaar exhibition in Kolhapur


By nisha patil - 1/30/2025 10:46:29 PM
Share This News:



गांधी शिल्प बाजार प्रदर्शनाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

२९ राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण हस्तकला वस्तू एकाच छताखाली

खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन; कारागीरांसाठी क्लस्टर योजनेचा उल्लेख

कोल्हापुरातील राजारामपुरी येथील भारत हौसिंग सोसायटीच्या सभागृहात गांधी शिल्प बाजार आणि हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय आणि हस्तकला विभागाच्या वतीने भरवलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले.

या प्रदर्शनात २९ राज्यांतील ४० स्टॉल्स असून, कोल्हापुरी चप्पल, पैठणी, सोलापुरी चादर, वारली पेंटिंग, तसेच बांबू, गवत, फायबरपासून बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, तंजावर पेंटिंग, लाकडी शिल्पकृती यांचा समावेश आहे. खासदार महाडिक यांनी प्रदर्शनातील स्टॉल्सना भेट देत कारागिरांशी संवाद साधला आणि काही वस्तू खरेदी केल्या.

जीआय टॅग प्राप्त कोल्हापुरी चप्पलच्या खास सेलिब्रिटी कलेक्शनचे लाँचिंग यावेळी करण्यात आले. खासदार महाडिक यांनी कारागीरांसाठी क्लस्टर योजना राबवण्याची तयारी दर्शवली आणि हस्तकला पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची सूचना केली.

हे प्रदर्शन ४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, नागरिकांनी भेट देऊन पारंपरिक हस्तकला वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


गांधी शिल्प बाजार प्रदर्शनाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 36