बातम्या
वाशी पंचक्रोशीत पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
By nisha patil - 3/3/2024 8:42:56 PM
Share This News:
वाशी पंचक्रोशीत पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
वाशी पंचक्रोशीतील नंदवाळ,पिरवाडी, शेळकेवाडीसह इतर गावात पाच वर्षाच्या आतील बालकांना पल्स पोलिओ लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम नियंत्रण महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक विभागाच्या वतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी,'पोलिओवर विजय दरवेळी,हे घोषवाक्य घेऊन संपूर्ण राज्यात पल्स पोलिओ मोहीम राबवली गेली. यासाठी आरोग्य विभागाकडून पल्स पोलिओची लस घेण्याच्या आवाहनातुन कित्येक दिवस प्रबोधन चालू होते. ४ मार्च ते ८ मार्च पर्यंत घरोघरी जाऊन आय.पी.पी.आय.चे सुद्धा लसीकरण होणार आहे.उपकेंद्र वाशी अंतर्गत नंदवाळ,पिरवाडी, शेळकेवाडी इत्यादी गावामध्ये पाच बूथ होते.पाच वर्षाच्या आतील ७७० पैकी ६७१ बालकांना पोलिओ लसीकरण देण्यात आले.
यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी अनिल गंबरे ,आरोग्य सेवक संग्राम रोगे विशेष सहकार्य लाभले यावेळी सरपंच शिवाजी जाधव मिठारी,उपसरपंच जयसिंग पाटील, ग्रा.प.सदस्य अरुण मोरे, ग्राम विकास अधिकारी पी.एम.भोपळे,आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
वाशी पंचक्रोशीत पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
|