शैक्षणिक
विवेकानंद महाविद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न
By nisha patil - 10/2/2025 7:03:54 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न
कोल्हापूर - विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला. या महोत्सवात बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, खो-खो, बास्केटबॉल, कबड्डी, फुटबॉल व क्रिकेट अशा आठ स्पर्धांमध्ये ६५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
प्रमुख पाहुणे प्रा. किरण पाटील यांनी खेळाचे महत्त्व स्पष्ट केले, तर रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वरणा वडगावकर यांनी प्रतिनिधित्वाच्या भावनेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार होते.
संयोजनासाठी प्रा. डॉ. आर.आर. कुंभार, डॉ. श्रुती जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. संतोष कुंडले यांनी केले, तर आभार विराज खानविलकर यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचे विशेष योगदान लाभले.
विवेकानंद महाविद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न
|