बातम्या

विवेकानंद मध्ये श्री आनंदा बोंगे यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न

Sri Ananda Bonge Retirement Goodwill Ceremony Concluded in Vivekananda


By neeta - 1/2/2024 12:49:34 PM
Share This News:



कोल्हापूर दि. 1 :  श्री आनंदा बोंगे यांनी 30 वर्षे सेवा प्रामाणिकपणे पार पाडली आहे.  त्यांनी संस्थेशी एकनिष्ठ राहून समाजाप्रती मी देणे लागतो या भावनेने आपली सेवा बजावली आहे.  आपणास दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडा. तरच असा सेवानिवृती सदिच्छा समारंभ होतो.  सेवानिवृती नंतरचे जीवन आरोग्यपूर्ण व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.  असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार  यांनी  श्री. आनंदा बोंगे  यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना  केले.  याप्रसंगी विवेकानंद कॉलेजच्या प्रशासकीय स्टाफतर्फे  श्री आनंदा बोंगे  यांचा मा. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार  यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ्,  देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

            सत्काराला उतर देताना श्री बोंगे  यांनी संस्थेने व महाविद्यालयाने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली.  प्रास्ताविक श्री. हितेंद्र साळुंखे, प्रशासकीय कर्मचारी प्रतिनिधी व सहाय्यक ग्रंथपाल  यांनी केले. आभार महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. आर.बी.जोग  यांनी मानले तर सुत्रसंचालन श्री अमर जाधव व ग्रंथपाल डॉ.नीता पाटील यांनी केले.  याप्रसंगी प्रा.एस.टी.शिंदे  यांनी मनोगत व्यक्त्‍ केले. या प्रसंगी प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता.


विवेकानंद मध्ये श्री आनंदा बोंगे यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न