बातम्या
श्री चिले महाराज पायी-पालखी रथ सोहळ्यात आ. डॉ. विनय कोरे यांची उपस्थिती
By nisha patil - 1/17/2025 2:20:17 PM
Share This News:
श्री चिले महाराज पायी-पालखी रथ सोहळ्यात आ. डॉ. विनय कोरे यांची उपस्थिती
जेऊर (ता. पन्हाळा) येथून श्री सदगुरू राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री चिले महाराज यांचा वार्षिक पायी-पालखी रथ सोहळा श्री क्षेत्र जेऊर - पैजारवाडी ते श्री दत्त मंदिर संस्थान, श्री क्षेत्र मोर्वे (ता. खंडाळा, जि. सातारा) यासाठी आयोजित करण्यात आला होता. या पवित्र सोहळ्याला आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून श्री चिले महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी सचिव तानाजी पाटील, विजय पाटील, धोंडीराम पाटील, नामदेव पोवार, दत्ता पाटील, निरंजन सरवदे, जगन्नाथ खांडेकर, बाबासाहेब चिले, आकाश घोसाळकर, राज पाटील, सतिश चौगुले, महादेव चौगुले, अतुल चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याला भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, पायी-पालखी रथ सोहळ्याच्या माध्यमातून भक्तांनी आपली श्रद्धा व्यक्त केली.
श्री चिले महाराज पायी-पालखी रथ सोहळ्यात आ. डॉ. विनय कोरे यांची उपस्थिती
|