शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात 'सृष्टी संजीवन' राष्ट्रीय परिषद उद्यापासून
By nisha patil - 5/3/2025 3:28:56 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात 'सृष्टी संजीवन' राष्ट्रीय परिषद उद्यापासून
राजर्षी शाहू सभागृहात ६ व ७ मार्चला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
शिवाजी विद्यापीठात भूगोल अधिविभाग, इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रीजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात ६ व ७ मार्चला 'सृष्टी संजीवन' या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रमोद पुंगावकर, डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पूर, पाणी, प्रदूषण व प्रकाश हे घटक सध्या हवामानातील बदलास कारणीभूत ठरत आहेत. मानवी जीवनावर याचे परिणाम प्रकषने जाणवत आहेत. याची शास्त्रीय दृष्टिकोनातून कारणमीमांसा व उपाययोजना यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. या उद्देशाने परिषदेचे आयोजन केले आहे. गुरुवार ६ रोजी सकाळी दहा वाजता खा. शाहू महाराज यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी असतील. महापालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद माने यांची प्रमुख उपस्थिती असेल.
शिवाजी विद्यापीठात 'सृष्टी संजीवन' राष्ट्रीय परिषद उद्यापासून
|