बातम्या

खोची मुक्कामी एसटी तात्काळ सुरु करा

Start Khochi stay ST immediately


By nisha patil - 7/21/2023 7:17:56 PM
Share This News:



खोची : प्रतिनिधी - हातकणंगले तालुकयातील खोची या ठिकाणी मुक्कामी असणारी एसटी कमी उत्पत्न मिळत असल्याचे कारण देत  एसटी महामंडळाने कोणतीही सूचना न देता बंद केली आहे . त्यामुळे सकाळी खोचीतून वारणानगर , कोल्हापूर तसेच पेठ वडगाव या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा प्रचंड फटका बसत आहे . सकाळी जाण्यासाठी गावातून एसटी नसल्याने पहिला तास चुकून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . याचबरोबर विद्यार्थ्यांच्याबरोबरच कामावर जाणाऱ्या प्रवासी महिला वर्गाला , पुरुष वर्गाला अधिक त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे मुक्कामी एसटी तात्काळ सुरु करावी अशी मागणी परिसरातून होत आहे . 
         याबाबत अधिक माहिती अशी कि , सकाळी खोचीतून वडगावला जाण्यास असणाऱ्या ६. २५ , ८ .३० , ९. ४० या वेळेतील फेऱ्या चालू कराव्या तसेच संध्याकाळी वडगावमधून ८. ०० वाजता बुवांचे वाठार मार्गे खोचीला येणारी  मुक्कामी एसटी तात्काळ सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी , महिला प्रवासी तसेच सर्व परिसरातून होत आहे .या फेऱ्या बंद असल्या कारणाने खोचीहून बाहेर शिक्षण , नोकरीस तसेच इतर कामास जाणाऱ्या प्रवासी वर्गाला अधिक त्रास सहन करावा लागत आहे . तसेच शाळेस जाणारे पासधारक विद्यार्थ्यांना या फेऱ्या बंद असल्या कारणाने पास असूनही पर्यायी मार्गे रिक्षा , लिफ्ट मागून जाणे यासारख्या अडचणींना समोर जावे लागत आहे . यासर्वात मुलीसह कामास जाणाऱ्या महिला वर्गाला जास्त अडचणीचा सामना करावा लागत आहे . लवकरात लवकर खोचीतील ही मुक्कामी एसटी चालू करावी अशी मागणी खोचीसह भेंडवडे ,लाटवडे परिसरातुन होत आहे .एसटी महामंडळाच्या या नियोजनशून्य कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे 


खोची मुक्कामी एसटी तात्काळ सुरु करा