बातम्या

सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर सुरु करा अन्यथा ट्रेन रोको आंदोलन

Start Sahyadri Express Kolhapur otherwise stop the train movement


By nisha patil - 4/7/2023 4:54:54 PM
Share This News:



सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर सुरु करा अन्यथा ट्रेन रोको आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी सह्याद्री एक्सप्रेस ही गेली अनेक महिने बंद आहे. ही बाब प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत दयनीय आहे,जास्ती करून महिला वर्गाला याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ज्या महिला व्यापार करतात त्यांना गाडी ची सोय होतं नाही कारण आताच्या स्तिथीला फक्त महालक्ष्मी ही एकच सुरु असलेने नागरिकांची आणि महिलांची धावपळ आणि वेळ वाया जात आहे. मुंबईला एकच गाडी चालू असल्या मुळे सर्व सामान्य जनतेला दोन दिवस वेटींग तिकीट साठी थांबावं लागत  आहे.
 

तरी लवकरात लवकर सह्याद्री एक्सप्रेस सुरु करावी अशी मागणी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. अन्यथा महिलाआघाडी च्या वतीने ट्रेन रोको आंदोलन करण्यात येईल


 *यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी  ठाकरे, तसेच कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर, महिला संपर्क प्रमुख श्रद्धा ताई जाधव, जयश्री ताई बळीकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा संघटीका शुभांगी पोवार यांचे सर्वांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटीका स्मिता सावंत मांडरे , अश्विनी घोटगाळकर, स्वरूपा खुरंदले, अनिता ठोंबरे, संगीता मुळीक रंजना संकपाळ, वर्षा पाटील, माधवी लोणारे ,शोभा खेडकर, जयश्री माडीमगिरी, शुभांगी पिसाळ, रीमा देशपांडे, अँजेला रॉबर्ट उपस्थित होत्या.


सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर सुरु करा अन्यथा ट्रेन रोको आंदोलन