बातम्या

रोज १ चमचा साय खाण्यास सुरुवात करा आणि बघा फायदे

Start consuming 1 teaspoon of psyllium per day and see the benefits


By nisha patil - 3/4/2024 7:12:06 AM
Share This News:



दुधाची साय खाल्ल्याने वजन वाढते, असा अनेकांचा समज असतो. परंतु रोज एक किंवा दोन चमचे साय खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते, असे तज्ज्ञ सांगतात. तसेच नियमित योग्य प्रमाणात साय खाल्ल्यास आरोग्यसंबंधी अनेक फायदे होतात. साय खाल्ल्याने होणारे १० फायदे आपण जाणून घेणार आहोत.

१ हृदयरोग 
यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात.
यामुळे कोलेस्टेरॉल कमी होतात, आणि हार्ट अटॅकपासून बचाव होतो.

२ डोळ्यांची शक्ती
सायीत व्हिटॅमिन ए असते. यामुळे डोळ्यांची शक्ती वाढते.

३ संधीवात
यामध्ये व्हिटॅमिन के २ असते. यामुळे मसल्स मजबूत होतात. संधीवाताचा त्रास होत नाही.

४ डायजेशन
यामध्ये शॉर्ट चॅन फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे डायजेशन चांगले होते.

५ आजारांपासून मुक्ती
यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आजारांपासून बचाव होतो.

६ अल्सर
सायमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे अल्सर टाळण्यास मदत होते.

७ सौंदर्य
यातील अँटिऑक्सिडंट रिंकल्स दूर करते. सौंदर्य वाढवते.

८ मजबूत दात
यामध्ये फॉस्फरस असते. ज्यामुळे दात मजबूत राहतात.
 
९ रक्तदाब
सायीमध्ये पोटॅशियम असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
 
१० वजन
सायमध्ये फॅटी अ‍ॅसिड असतात, जे शरीरातील फॅट बर्न करतात. यामुळे वजन कमी होते.


रोज १ चमचा साय खाण्यास सुरुवात करा आणि बघा फायदे